प्रश्न 1) माझी नोंदनी किती काळापर्यंत वैध राहील.
उत्तर- नोंदनी झाल्यापासून प्रमाणपञ पाच वर्षापर्यंत वैध राहील.
प्रश्न 2) कोणाच्या नावाने धनाकर्ष(Demand Draft) काढावा लागेल.
उत्तर- निबंधक, महाराष्ट्र राज्य पशु वैद्यकीय परिषद, नागपूर यांचे नावे धनाकर्ष काढावा
प्रश्न 3) नोंदनीचे नुतनीकरण करताना नोंदनी प्रमाणपञ परत द्यावे लागते काय?
उत्तर- होय दुरूपयोग टाळण्याच्या दृष्टीने प्राप्त जुने प्रमाणपञ रद्द करून संबंधिताचे नोंदवहीत नाव लावण्यात येते.
प्रश्न 4) माझे प्रमाणपञ हरवले आहे. मी काय करावे?
उत्तर- महाराष्ट्र राज्य पशुवैद्य परिषद नियम 2002 चे कलम 11(6) नुसार दुसरी प्रत प्राप्त करता येते. प्रत प्राप्त करून घेणा-याच्या दृष्टीने प्रमाणपञ हरवल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवून तसेच हमीपञ स्टँम्प पेपरवर देवून लागणा-या शुल्कासह विहीत प्रपञात अर्ज सादर करावा. नोंदनी प्रमाणपञ परत केल्यास भारतीय पशुवैद्य परिषद कायदा 1984 च्या कलम 58 नुसार कार्यवाही व दंडास पाञ ठरतात.
प्रश्न 5) मी एकदा नोंदनी केलेली आहे. मला पुनश्च नुतनीकरण करावी लागेल काय?
उत्तर- होय. भारतीय पशुवैद्य परिषद कायदा 1984 च्या कलम 48(1) नुसार दर पाच वर्षांनी नुतनीकरण करणे गरजेचे आहे.
प्रश्न 6) मी राँस युनिव्हरसिटी, अमेरी येथून “डाँक्टर आँफ व्हेटर्नरी मेडीसिन” पास केलेली आहे. मला महाराष्ट्र राज्य पशुवैद्य परिषद येथे नोंदणी करता येते काय?
उत्तर- नाही. विदेशातील पशुवैद्य विज्ञानाशी निगडीत सर्व पदव्या भारतीय पशुवैद्य परिषद कायदा 1984 चे प्रपञ 2 मध्ये समाविष्ठ नाही.तथापि या कायद्याचे 16(2)(ई) नुसार केंद्र शासन अधिसुचनेद्वारे विदेशातील पदवी समाविष्ठ करू शकणारा तसेच तो महाराष्ट्र राज्याचा रहीवाशी असावा.